सोलापूर : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे सोलापुरात दाखल झाले आहेत सायंकाळी साडेसहा वाजता ते विमानाने सोलापूर विमानतळावर दाखल झाले यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनीही स्वागत केले. माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख ही नेतेमंडळी स्वागताला विमानतळावर उपस्थित होती. केंद्रीय मंत्री गडकरी यांचा ताफा विमानतळावरून थेट हॉटेल बालाजी सरोवर मध्ये दाखल झाला त्या ठिकाणी गडकरी हे मुक्कामाला थांबणार आहेत.
सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता नेहरूनगर इथल्या शासकीय मैदानावर गडकरी यांच्या हस्ते विविध राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न होणार आहे.




















