Thursday, September 11, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले भावूक ; त्यांचे हे पत्र नक्की वाचा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 May 2024
in political
0
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले भावूक ; त्यांचे हे पत्र नक्की वाचा
0
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले भावूक ; त्यांचे हे पत्र नक्की वाचा

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्याचे मतदान झाले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही लोकसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यासाठी भाजपने राज्यात चांगली मोर्चेबांधणी केली होती. ही मोर्चेबांधणी कार्यकर्त्यांच्या जोरावर झाली. या निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेली कामे हे पक्ष कधीही विसरणार नाही. त्यामुळेच राज्यातील पाचही टप्पे संपल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रात काय म्हटलंय पाहुयात

*महाराष्ट्र भाजपा परिवारातील सर्व सहकारी मित्रांनो*

सप्रेम नमस्कार

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार पडले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करीत होता. ते स्वप्न होते, आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचे…  विकसित भारताचे…!

या स्वप्नासाठी आपण सर्वांनी अक्षरशः जीवाचे रान केले. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या प्रत्येक  कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मी आपल्या प्रामाणिक निष्ठेसमोर नतमस्तक आहे.

भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही. ते कुटुंब आहे. आपणा सर्वांचे एकमेकांशी असलेले नाते रक्ताच्या नात्यापलीकडचे आहे. या निवडणुकीत ही आपलुकी, जिव्हाळा मी क्षणोक्षणी अनुभवला. हे सारे क्षण मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवले आहेत. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला. खुद्द आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे भक्कम पाठबळ आपल्यासोबत होते. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सभेचे नियोजन, रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी आपण कार्यकर्त्यांनी किती बैठका घेतल्या असतील याची गणतीच नाही.

बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, सुपर वॉरियर्स, सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते, संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझे विधिमंडळातील सर्व आजी- माजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते.

प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गाव-खेड्यात आपण मोदीजींच्या विकसित भारताचे स्वप्न घेऊन पोहोचलो. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, अमित भाई शाह यांनी प्रत्येक पावलावर आपल्याला खंबीर साथ दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांचा उत्साह सतत उंचावत गेला.

मित्रांनो, एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो, राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे. एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी होत, काळजी घेत आपण सर्वजण अविश्रांत राबलात त्यामुळेच आपला पक्ष या निवडणुकीत फार मोठ्या यशाला गवसणी घालणार आहे. हे सारे यश केवळ आणि केवळ तुमचेच राहणार आहे.

आपण या निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत आहे. किंबहुना ते माझे कर्तव्य आहे.

४ जूनला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू. तुम्हाला जशी आतुरता आहे, तसाच मी देखील उत्सुक आहे.

पुन्हा आपले सर्वांचे मनापासून आभार.

आपला नम्र

चंद्रशेखर बावनकुळे
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र

Tags: BJP workersChandrashekhar bavankuleLoksabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या कंबर तलावात युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न ; घटना सीसीटीव्हीत कैद, युवकांनी वाचवला जीव

Next Post

राम सातपुते खर्च करण्यात अव्वल ; प्रणिती ताईंचा झाला इतका खर्च ; माढयात प्रचारावर कुणाचा किती झाला खर्च?

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

अनंत जाधव यांचा भाजप उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा ; ज्या दिवशी निवड त्या दिवशी राजीनामा

अनंत जाधव यांचा भाजप उपाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा ; ज्या दिवशी निवड त्या दिवशी राजीनामा

10 September 2025
“भाई घर वापसी होगी क्या” ; बाबांवर काँग्रेसचे अजूनही प्रेम कायम ; थेट या यादीत दिसले नाव

“भाई घर वापसी होगी क्या” ; बाबांवर काँग्रेसचे अजूनही प्रेम कायम ; थेट या यादीत दिसले नाव

10 September 2025
श्रीशैल रणधिरे यांच्यावर काँग्रेसने दिली या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

श्रीशैल रणधिरे यांच्यावर काँग्रेसने दिली या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी

9 September 2025
जिल्हा प्रशासनाची चॉईस कोण? बापू की दादा !

जिल्हा प्रशासनाची चॉईस कोण? बापू की दादा !

9 September 2025
सोलापुरात शिवसेनेच्या नेत्याकडून कव्वालीची पेशकश ; समी मौलवीच्या पहिल्याच कार्यक्रमाची जोरदार मार्केटिंग

सोलापुरात शिवसेनेच्या नेत्याकडून कव्वालीची पेशकश ; समी मौलवीच्या पहिल्याच कार्यक्रमाची जोरदार मार्केटिंग

8 September 2025
दिलीप कोल्हेंकडे शिवसेनेचे अधिकृत कोणतेच पद नव्हते ; ते आले काय अन् गेले काय फरक पडत नाही ; महेश नानाचा पलटवार

दिलीप कोल्हेंकडे शिवसेनेचे अधिकृत कोणतेच पद नव्हते ; ते आले काय अन् गेले काय फरक पडत नाही ; महेश नानाचा पलटवार

8 September 2025
अरं कुठाय दादा ! देवेंद्र दादांना शुभेच्छा देण्यासाठी जयाभाऊंची घरी सरप्राइज भेट…….

अरं कुठाय दादा ! देवेंद्र दादांना शुभेच्छा देण्यासाठी जयाभाऊंची घरी सरप्राइज भेट…….

8 September 2025
सोलापूर शहराच्या राजकारणातील आश्वासक नेतृत्व : आमदार देवेंद्र दादा कोठे

सोलापूर शहराच्या राजकारणातील आश्वासक नेतृत्व : आमदार देवेंद्र दादा कोठे

8 September 2025

क्राईम

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
3 September 2025
0

सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतर्यांवर नग्न अवस्थेत चढणाऱ्याचा मारहाणीत मृत्यू ; दोघांवर गुन्हा दाखल सोलापूर : बुधवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या

by प्रशांत कटारे
22 August 2025
0

सोलापुरात जीएसटी नंबर साठी पाच हजाराची लाच घेतली ; दोन अधिकाऱ्यांना बेड्या सोलापूर : ठेकेदाराला जीएसटी नंबर देण्यासाठी पाच हजाराची...

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड

by प्रशांत कटारे
8 August 2025
0

प्रमोद गायकवाड यांच्या जेल बदलीचा अर्ज मागे घेतला ; वैभव वाघे खून खटल्यात महत्वाची घडामोड सोलापूर- सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर...

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार

by प्रशांत कटारे
6 August 2025
0

सोलापुरात पोलिसांचा दणका ! माजी नगरसेवक मुलासह तडीपार सोलापूरच्या पोलिसांनी मोठा दणका दिला असून गोवंशय जनावरांच्या कत्तली करणाऱ्या माजी नगरसेवक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Aug    

Our Visitor

1867253
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group