ब्रेकिंग ! भाजपची सोलापुरात महिलेला संधी ; रोहिणी तडवळकर शहराध्यक्ष तर शशिकांत चव्हाण जिल्हाध्यक्ष
सोलापूर : भारतीय जनता पार्टीने राज्यात संघटनात्मक बदल करताना नव्या शहराध्यक्ष पदाची घोषणा केली त्यामध्ये अनपेक्षित पणे सोलापूर शहराध्यक्षपदी माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर यांची निवड झाली आहे. सोलापुरात शहर अध्यक्षपदावर भारतीय जनता पार्टीने प्रथमच पहिला बसवल्याने कौतुकांचा वर्ष होत आहे.
भारतीय जनता पार्टीने राज्यातील 58 शहर आणि जिल्हाध्यक्ष पदांच्या नियुक्ती केल्या त्यामध्ये सोलापूर शहराध्यक्षपदी रोहिणी तडवळकर यांची निवड करणे केली आहे तर सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष पदावर शशिकांत चव्हाण यांना संधी देण्यात आले असून सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष पदावर चेतन सिंह केदार यांची फेर निवड झाली आहे.


भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा सौ. रोहिणी तडवळकर यांचा परिचय
रोहिणी रामचंद्र तडवळकर, लहानपणापासून राष्ट्रसेविका समिती तसेच महाविद्यालयीन काळात विद्यार्थी परिषदेच्या कामात अग्रभागी. महाविद्यालयीन आणि शैक्षणिक आंदोलनामध्ये मोठा सहभाग. 1992 ला सोलापूर महापालिकेला शुक्रवार पेठ परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 1992 ते 1997 त्यानंतर महापालिका परिवहन समिती सदस्य, 2002 ते 2007 पुन्हा तुळजापूर वेस, बाळीवेस परिसरातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या.
2012 ते 2017 नगरसेविका आणि विरोधी पक्ष नेता,भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहर अध्यक्ष म्हणून देखील काम केलेले आहे.त्याचप्रमाणे शुक्रवार पेठ भागात राणी लक्ष्मी बाई महिला पतसंस्थेच्या माध्यमातून या भागात सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक या क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्या अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर,राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्र स्तरावर अपंग कार्यक्षेत्रात त्यांच्या कामाची नोंद आहे. रोटरी मूकबधिर विद्यालय सोलापूर, येथून प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत.