सुभाष देशमुख माझे पालक ; बापू – भाऊंची पुन्हा दिलजमाई ?
सोलापूर : राजकारणामध्ये कोणत्या कारणावरून दुरावा निर्माण होईल आणि असा कोणता प्रसंग येईल की तो पुन्हा तुटलेली मने जुळवून जाईल हे कधीही सांगता येत नाही. राज्याचे माजी सरकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे जुने स्नेही आणि भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांच्यात पुन्हा दिलजमाई झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राज्याचे नूतन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले आहेत गुरुवारी त्यांचे सायंकाळी विमानतळावर आगमन झाले यावेळी प्रांतिक सदस्य शहाजी पवार हे आवर्जून उपस्थित होते ते सोबतच निघाले.
दरम्यान रस्त्यात आमदार सुभाष देशमुख यांचे निवासस्थान आहे. त्या ठिकाणी देशमुख यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना चहासाठी निमंत्रित केले होते. यावेळी विखे यांच्यासोबत शहाजी पवार सुद्धा बापूंच्या निवासस्थानी गेले अनेक दिवसानंतर भाऊ हे बापूंच्या निवासस्थानी दिसून आले. हे फोटो सोशल मीडियावर दिसल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की बापू आणि भाऊ यांची दिलजमाई झाली का?
दरम्यान शहाजी पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सुभाष देशमुख हे माझे नेते आणि पालक आहेत, आमच्या मध्ये कोणतीही कटुता नाही असे उत्तर त्यांनी दिले.