चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले देवेंद्र कोठे यांचे विशेष अभिनंदन
भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र संघटन पर्व कार्य शाळा आज पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 विधानसभा मतदारसंघ ज्यांनी सदस्यता नोंदणी अभियानात उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली. अशा 5 विधानसभा मतदारसंघाचे अभिनंदन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाने दिलेल्या उद्दिष्ट पूर्ण करत 63 हजार पेक्षा जास्त सदस्यता नोंदणी पूर्ण करत शहरात पहिली उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या विधानसभेचा मान मिळविला व यामुळे पहिल्यादांच आमदार झालेल्या देवेंद्र कोठे यांचा बावनकुळे यांनी कौतुक करत विशेष अभिनंदन केले. पश्चिम महाराष्ट्रातील 5 विधानसभा मतदारसंघ पैकी 2 विधानसभा या अक्कलकोट व शहर मध्य हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.