भाजपा सदस्य नोंदणी अभियानात महिला मोर्चाच्या सुनीता कामाठी व लक्ष्मी बदलापुरे यांची आघाडी
भाजपा सदस्य महाअभियान निमित्त सोलापूर शहर मध्य आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष श्रीमती सुनिता सुनिल कामाठी व पूर्व पश्चिम मंडल महिला अध्यक्ष लक्ष्मी विश्वनाथ बदलापूरे यांनी विशेष अभियानाचे आयोजन केले होते. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या विशेष अभियानास आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा विजया वड्डेपल्ली आदीसह भाजपा पदाधिकारी, महिला मोर्चा पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सोलापूर शहर मध्य मध्ये महिला पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात भाजपचे सदस्य महाअभियान राबवत असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या भाजपा सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण होण्यास दादांच्या भगिनींचाही महत्वाचा खारीचा वाटा असेल असे श्रीमती सुनिता कामाठी व लक्ष्मी बदलापुरे यांनी संयुक्तपणे बोलले.