खासदार काय असतो हे आता सोलापूरकरांना दाखवतो ! राम सातपुते यांना मंगळवेढ्यात प्रतिसाद
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील ‘भारतीय जनता पार्टी प्रमुख कार्यकर्ता बैठक’ आमदार समाधान आवतडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली.
प्रारंभी समाधान आवताडे यांच्या निवासस्थानी उमेदवार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर मोठा उत्साहात संपन्न झालेल्या या बैठकीत सातपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. खासदार काय असतो हे आता मी सोलापूरकरांना दाखवणारच असे म्हणून सातपुते यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली, सुरुवात त्यांनीच पत्र पाठवून केली त्यामुळे मला बोलावे लागले परंतु आता यापुढे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल असे सांगत भाजप विजयाचा संकल्प केला.
आमदार समाधान आवताडे यांनी लोकसभेच्या प्रचाराच्या नियोजनाच्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी नकळत सुशीलकुमार शिंदे यांना लक्ष केले सुशीलकुमार शिंदे हे दोन वेळा या मतदारसंघातून विजयी झाले परंतु मंगळवेढा पंढरपूर भागाच्या विकासाकडे त्यांच्या दुर्लक्ष झाले आपल्या जावयासाठी काय पण या भूमिकेतून मंगळवेढ्यात जावयाला एमआयडीसीमध्ये सोलर प्रोजेक्ट दिल्याची टीका केली.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, विधानसभा प्रमुख राजेंद्र सुरवसे, जिल्हा सचिव संतोष मोगले, सिद्धेश्वर कोकरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, माजी सभापती सोमनाथ आवताडे, मा.व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी, मा.सुरेश भाकरे, मा.केदार, डॉ.शरद शिर्के, दत्तात्रय यादव, सरपंच विनायक यादव, कैलास कोळी, नागेश डोंगरे, दिगंबर यादव, सचिन शिंदे, जगन्नाथ रेवे, सचिन शिवशरण, युवराज शिंदे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.