भाजपच्या बालेकिल्लात युवराज राठोड यांची रेकॉर्ड ब्रेक रॅली ; कार्यकर्त्यांची एक किलोमीटर रांग; अब आयेगा मजा
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांच्या रविवारच्या विराट अशा प्रचार रॅलीने संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या जुळे सोलापूर परिसरात युवराज राठोड यांची प्रचार रॅली काढण्यात आली. वाजत गाजत निघालेल्या या प्रचार रॅलीचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.
तब्बल एक किलोमीटर एवढी ही रॅली होती. या रॅलीतील गर्दी पाहून या भागातून निघालेली दुसऱ्या रॅलीतील विरोधात असणारे उमेदवार ही अवाक् झाले.
युवराज राठोड म्हणाले, जुळे सोलापूर हे माझे होमटाऊन आहे, 24 तास उपलब्ध असणाऱ्या माणसाची आता या मतदार संघाला गरज आहे त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींना सक्तीच्या राजावर पाठवण्याची वेळ आली आहे.