Saturday, February 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बालाजी अमाईन्सने बसवलेली विद्युत दाहिनी बंद ! सामाजिक कार्यकर्ते केतन वोरा महापालिकेच्या कारभारावर संतापले !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 March 2024
in Social
0
बालाजी अमाईन्सने बसवलेली विद्युत दाहिनी बंद ! सामाजिक कार्यकर्ते केतन वोरा महापालिकेच्या कारभारावर संतापले !
0
SHARES
524
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बालाजी अमाईन्सने बसवलेली विद्युत दाहिनी बंद ! सामाजिक कार्यकर्ते केतन वोरा महापालिकेच्या कारभारावर संतापले !

सोलापूर : बालाजी अमाईन्सच्या वतीने एक कोटी 27 लाख रुपये सीएसआर निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत बसविलेली विद्युत दाहिनी महापालिकेच्या उदासीनतेमुळे बंद अवस्थेत आहे. महापालिकेने तत्काळ विद्युत वाहिनीची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी समाजसेवक तथा उद्योजक केतन वोरा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक उपायोजना करीत असताना इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करण्यासाठी बालाजी अमाईन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून सोलापूर महापालिकेच्या रुपाभवानी स्मशानभूमी येथे अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसविणे व आजूबाजुचा परिसर विकसित करण्यासाठी सुमारे 1 कोटी 27 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला. या निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी,  श्रध्दांजली सभागृह / वेटिंग हॉल (१४मी. x १२मी.), पुरुष व महिला यांच्यासाठी २ स्वतंत्र स्वच्छता गृह युनिट व हातपाय धुण्याकरिता स्वतंत्र हँडवॉश सेंटर, विद्युत दाहिनी परिसरास पूर्ण बंदीस्त करण्यासाठी  चेनलिंक फेन्सिग व गेट, विद्युत दाहिनी परिसरात छोटे उद्यान, वृक्षारोपण, अंत्यविधीस उपस्थित नागरिकांना बसण्याकरिता मार्बलचे १७ बाकडे, पूर्ण परिसरास रंगरंगोटी व लाईट फिटींग्ज गुणवत्तापूर्ण, नेटक्या पद्धतीने पूर्ण करून देण्यात आली. बालाजी अमाईन्स कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) हे मोठे काम शहरवासीयांच्या मदतीसाठी महापालिकेस मोलाचे सहकार्य केले आहे.

दरम्यान, बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने येथील विद्युत दाहिनी व सर्व परिसराचे दि. 26 जानेवारी 2022 रोजी लोकार्पण करण्यात आले. महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने विद्युत दाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता दोन वर्षासाठी मनीष इटरप्राईजेस या मक्तेदाराला देण्यात आला. तसा दोन वर्षाचा करारही करण्यात आला. दरम्यानच्या काळात या देखभाल दुरुस्ती मक्ता कराराची दोन वर्षाची मुदत दि. 5 जानेवारी 2024 रोजी संपली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने येथील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे मात्र गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून येथील विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. दि. 14 मार्च 2024 रोजी अंत्यसंस्कारासाठी तेथे विचारणा केली असता ही मशीन बंद असल्याचे सांगण्यात आले. स्पेअर पार्ट बिघडल्याने मशीन बंद आहे स्पेअर पार्ट मागविण्यात येत आहे. त्यानंतर दुरुस्ती करण्यात येईल, असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. अद्यापही महापालिका प्रशासनाकडून ही विद्युत वहिनी सुरू करण्यात आली नाही.

परिणामी कोट्यावधी रुपयाचा खर्च करून सीएसआर फंडातून बालाजी अमाईन्सने बसविलेल्या मशीनच्या देखभाल दुरुस्ती कडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दुरुस्ती कामासाठी दिरंगाई होत आहे. ही गंभीर बाब आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. महापालिका देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष करत असेल तर कोट्यावधी निधीतून कामे करून काय उपयोग, असा सवाल उद्योजक केतन वोरा यांनी केला आहे. तातडीने महापालिका प्रशासनाने विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि नागरिकांची सोय करावी, अशी मागणीही यावेळी उद्योजक केतन वोरा यांनी केली आहे.

महापालिकेला देखभाल दुरुस्ती जमत नसल्यास मक्तेदार नेमावा

रूपा भवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी
बालाजी अमाईन्सने मागील दोन वर्ष मक्ता दिला होता. त्यामुळे दोन वर्षात कोणतीही अडचण आली नाही. त्याचप्रमाणे महापालिकेला जमत नसल्यास मक्तेदार नेमून त्यांच्याकडून हे काम करून घ्यावे, अशी मागणी उद्योजक केतन वोरा यांनी केली आहे.
—–

Tags: Ketan VoraSolapur municipal corporationरूपा भवानी स्मशानभूमी
SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ, जुबेरभाईंच्या जोडीला 16 उपाध्यक्ष, 35 सरचिटणीस, 17 संघटक, 3 विधानसभा कार्याध्यक्ष, 8 मार्गदर्शक ही निवडले ; कुणाला मिळाली संधी

Next Post

शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा खोचक टोला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा खोचक टोला

शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा खोचक टोला

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970477
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group