भिमकन्या प्रणिती शिंदेंना खासदार करण्यात बाबासाहेबांच्या रक्ताचा वाटा ; संध्या काळे यांनी आणली आकडेवारी समोर
सोलापूर : काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार झाल्या. प्रणिती शिंदे यांच्या विजयात महिला काँग्रेसचा ही मोठा वाटा म्हणावा लागेल.
काँग्रेस मधील प्रभाग निरीक्षक संध्या काळे यांनी प्रणिती यांचे खासदार झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. काळे म्हणाल्या, सोलापुरातील बौद्ध समाज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताने एका भीम कन्येला खासदार करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. ही संविधानाची ताकद असून सोलापूर शहर काँग्रेसच्या महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांच्या सोबतीने कोणत्याही गोष्टीला बळी न पडता निष्ठेने व प्रामाणिकपणे महिला आघाडीने काम केले आहे.
संध्या काळे यांच्या कडे देण्यात आलेल्या मिलिंद नगर मधील बूथवर
बूथ क्रमांक १५१- ४१०
बूथ क्रमांक १५२- ५४३
बूथ क्रमांक १५३-४८८
एवढी मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली आहेत.
बूथ क्रमांक १५१-१८१
बूथ क्रमांक १५२-३५
बूथ क्रमांक १५३-७८
एवढे भाजपला मतदान झाले असून ७०% मतदान हे काँग्रेसला झाले आहे.