अकलूज मध्ये अँटी करप्शनची रेड ; दोन लाख लाच मागणाऱ्या स्वच्छता निरीक्षकाला बेड्या
कामगारांच्या मासिक बिलाच्या ३ टक्के रक्कम व यापुर्वी वर्क ऑर्डर दिलेल्या कामाचा मोबदला म्हणुन १,५०,००० रु. असे मिळून १,९५,००० रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकलूज नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
लोकसेवक नितीन सिद्राम पेटकर, वय ४० पद स्वच्छता निरीक्षक नेम- अकलुज नगरपरिषद, अकलुज रा. बासलेगांव रोड, पिरजादे प्लॉट, लोखंडे मंगल कार्यालय जवळ, अक्कलकोट ता. अक्कलकोट जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचे श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, बारामती या नावाची कंपनी असून सदर कंपनी विविध नगरपरिषद, नगरपालिकेस साफ-सफाई व इतर कामकाजाकरीता मनुष्यबळ पुरवठा करत असते. सदर कंपनीच्यावतीने विविध आस्थापनेशी समन्वय साधून टेंडर भरणे, मनुष्यबळ पुरविणे, पत्रव्यवहार करणे, वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणे इ. शासकीय कामे करते. अकलूज नगरपरिषदेने शहरातील रस्ते, बाजारपेठा वाणिज्य गाळे, शौचालय साफ सफाई करणेकामी मनुष्यबळ पुरवठा करणेकरीता प्रसिध्द केलेला टेंडर श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, बारामती यांना मंजूर झाले असून सदर कंपनीने अकलूज नगरपालिकेस मनुष्यबळ पुरवठा केला होता. श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, बारामती यांना टेंडर मंजुर झाल्यानंतर निविदा दर मंजुर करून वर्क ऑर्डर देताना यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे कामगारांच्या मासिक येतनाच्या बिलाच्या तीन टक्के रक्कम व वर्क ऑर्डर मंजुरीचे १,५०,०००/- रुपये असे एकुण १,९५,०००/- लाचेची रूपयांची मागणी केली आहे. यावरुन वर नमुद लोकसेवक यांचे विरुध्द अकलुज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.