अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा झाला थाटात गौरव ; जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी ‘आनंदवाडी करू ; सीईओ मनिषा आव्हाळे यांचे आवाहन
सोलापूर : अंगणवाडी कर्मचारी मनापासून काम करत असल्यामुळे त्यांचे काम खूप सुंदर होत आहे. रे नगर मध्ये ज्या पद्धतीने अंगणवाडी ही आनंदवाडी झाली त्याच पद्धतीने येत्या काळात जिल्ह्यातील काही अंगणवाड्यांना नवीन स्वरुप देण्यात येणार आहे. यापुढे प्रत्येक अंगणवाडी ही आनंदवाडी करू या त्यासाठी कर्मचाऱ्यांनी जोमाने काम करावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा अव्हाळे यांनी केले.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्काराचे सीईओ आव्हाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनीषा वाकडे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी नरेंद्र खराडे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अमृतसर डे वर्षा पाटील यांच्या हस्ते एकूण 48 सेविका 48 मदतनीस यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व प्रति सेविका तीन हजार रुपये व प्रति मदतनीस दोन हजार रुपये तसेच प्रत्येक प्रकल्पातून एका पर्यवेक्षिकेस आदर्श परिवार शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले.
प्रारंभी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले, अंगणवाडी कर्मचारी हे ए फॉर पासून झेड फॉर ZP च्या सर्व विभागांशी समन्वय राखून कामकाज करतात, कोणत्याही कामाला नाही न म्हणता प्रत्येक कामे जबाबदारीने करत असलेने आदर्श पुरस्कारासाठी पात्र असलेचे वक्तव्य केले.
मोहोळचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामीण पर्यवेक्षिका व सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा प्रकल्पातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी तसेच इतर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जिल्हयातील सर्व विस्तार अधिकारी सांख्यिकी यांनी देखील विविधतेत एकता या संकल्पनेवर फॅशन शो सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.