अन् वंचित महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला ; शिवसेनेच्या सीमा पाटील यांचा आदर्शवत उपक्रम
मोहोळ येथे शुक्रवारी फाटे मंगल कार्यालय इथ समर्पिता महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका माजी नगरसेविका सीमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित महिलांसह सर्वच महिलांना हळदीकुंकू कार्यक्रम घेऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श माता रुक्मिणी गायकवाड, समाजभूषण महानंदा आंडगे, गौरव भूषण आईनुर शेख यांना पुरस्कार देण्यात आला.
अलका शहा, मनीषा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. पहिल्यांदाच कुंकूसाठी वंचित महिलांसह सर्व महिलांसाठी मोहोळ शहरात असा कार्यक्रम झाला. हळदी कुंकू व तिळगुळ कार्यक्रमास महिलांच्याकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. “एक संक्रात कुंकवापलीकडे” या शीर्षकाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी महिलांचा अश्रूचा बांध फुटला. पती निधनानंतर आज हळदी कुंकाचा मान सीमा पाटील यांच्यामुळे मिळाला.आम्ही कृतज्ञ झालो. महिलांनी भावना व्यक्त केल्या. समाज प्रबोधन करणाऱ्या वंचित महिलांना सामावून घेणाऱ्या विशेष महिलांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना रसिदा शेख यांनी केली तर आभार प्रदर्शन आरती गायकवाड यांनी केले.
यावेळी डॉक्टर स्मिता पाटील, मंगल फाटे, शीलादेवी गायकवाड, जोशना जोशी, डॉ.सानिका झाडबुके, निर्मला डोंगरे, सुनीता लोखंडे, आशा वस्त्रे, लक्ष्मी पुराणिक, शोभा खर्गे, अन्नपूर्णा आदलिंगे, नागरबाई केवळेसह बहुसंख्येने वंचित महिलासह सर्वच महिला उपस्थित होत्या.