सोलापूर : उंच झाडावर पतंगाच्या मांजामध्ये अडकून जीवाच्या आकांताने धडपडत असणाऱ्या कावळ्याला सोलापूर शहरातील पक्षी मित्रांनी त्या जीवघेण्या मांजातून सुटका केली.
न्यू बुधवार पेठ परिसरातील डॉक्टर आंबेडकर उद्यानमध्ये पिंपळाच्या झाडावर 50 फूट उंचीवर पतंगीच्या मांज्या अडकून कावळा जिवाच्या आकांताने धडपडत होता. हे तेथील काही युवकांच्या लक्षात येताच त्यांनी नॅचरल ब्लू कोब्रा सर्पमित्र संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष दीपक इंगळे व ऍनिमल राहत या संघटनेला त्वरित संपर्क केला.
ही माहिती मिळताच संघटनेचे सदस्य या उद्यानात दाखल झाले. पंधरा मिनिटाच्या या प्रयत्नानंतर त्या पक्षाचा जीवघेण्या मांजातून सुटका झाली.
त्यामुळे या कावळ्याला जीवदान मिळाले.
नॅचरल ग्लो कोब्रा सर्पमित्र संघटनेचे दीपक इंगळे ऍनिमल राहत या संस्थेचे डॉक्टर देशमुख, डॉक्टर चव्हाण, सुभाष सूर्यवंशी, आदित्य क्षीरसागर, देविदास लंकेश्वर व इतर प्राणिमित्रांनी कावळ्याला जीवदान देण्यात आपली भूमिका बजावली.