सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे अतिशय कट्टर आणि निकटवर्तीय मानले जाणारे सोलापूरचे उमेश पाटील यांच्यावर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ता म्हणून निवड केली आहे. या निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
उमेश पाटील हे यापूर्वी प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्यरत होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अतिशय पद्धतशीर आणि तेवढ्याच ताकदीने मांडल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ही त्यांनी कामकाज पाहिले आहे. सोलापूर जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ही दोन पदे भूषवताना प्रशासकीय पातळीवर त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.