अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ; सोलापुरात लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाला दिल्या शुभेच्छा
सोलापूर – रक्षाबंधन निमित्त इच्छा भगवंताची मित्रपरिवार यांच्या वतीने सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये रक्षाबंधन निमित्ताने जमा केले.
यानिमित्त लाडक्या बहिणीने अजित पवार यांच्या प्रतिमेला राखी बांधून त्यांचे कृतज्ञता पर आभार मानले. अजित पवारांनी जाहीर केलेले लाडकी बहिण योजना आणि राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा सुरू झालेला वापर याकडे याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. पिंक कॅम्पेनची सर्वत्र चर्चा सुरू असून याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ येथील रामवाडी यूपीसी सेंटर येथे रक्षा बंधन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी लाडक्या बहिणीने यावेळी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित महिलांनी गुलाबी रंगाचा साडी परिधान केले होते तर इच्छा भगवंताची परिवाराकडून उपस्थित महिलांना गुलाबी रंगाचा ब्लाउज पीस देऊन ओटी भरण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित महिलांनी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांना राखी बांधून औक्षण केले.
अजितदादानी दिलेला शब्द पाळला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधन अगोदरच तीन हजार रुपये जमा झाले त्यानिमित्त सोलापुरातील लाडक्या बहिणीने अजित पवारांचे आभार मानले व अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा देखील उपस्थित महिलांनी व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या असल्याचे यावेळी किसन जाधव म्हणाले. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्यापर्यंत रामवाडी हॉस्पिटल आदिशक्ती देवी मंदिर विजापूर नाका दोन नंबर झोपडपट्टी शिवानंद किराणा दुकान येथे शिबिर ठेवण्यात आले असून याचा लाभ देखील उपस्थित महिलांनी घ्यावे असे आव्हान देखील यावेळी जाधव यांनी केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, महिला पदाधिकारी सायरा शेख, शशिकला कसपटे, शोभा गायकवाड, संगीता गायकवाड, प्रमिला बिराजदार, प्रमिला स्वामी,रंजना गायकवाड,उमेश जाधव, कुमार जाधव,ऋतिक गायकवाड, निलेश कांबळे, किरण शिंदे,अभिजीत कदम, महादेव राठोड, माणिक कांबळे, वसंत कांबळे,अमोल जगताप, सागर कांबळे, संतोष गायकवाड, माऊली जरग,अभिषेक हावणेकर, पवन बेरे, अंकित सरवदे, रामलिंग क्षत्रिय, डॉ. अनिल पवार, डॉ. शिल्पा शेट्टे,रिना गायकवाड,यास्मिन पठाण, सत्यभागा शिवशरण, अश्विन कोळी, सरोजिनी जाधव, लक्ष्मी आठवले,पूनम जाधव,रेखा गायकवाड, स्वप्नाली मोरे, सोनाली कारंडे, जाईबाई जाधव, राजश्री नंदी, कोलमट वेदिका कार्यकारी स्वाती कोळी, हनुमान शिंदे,निसर्ग मित्र मनोज देवकर,सरिता पवार,ललिता पवार, विजया, कांबळे, पूजा राठोड, लक्ष्मी कांबळे, नाझिया शेख, शिपा शेख, सुप्रिया शेख,अश्विनी जाधव, सुवासिनी गायकवाड, तनुजा गायकवाड, सुजाता रसाळ, प्रांजली गवळी, चंद्रकला वाघमारे, आकाश मुसे, रुपेश गायकवाड, संतोष माने, श्रीपाद नारायणकर,राजेंद्र हावळे आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित महिलांना इच्छा भगवंताची मित्र परिवाराकडून मिठाई वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवाराने परिश्रम घेतले.