शौकत पठाण कुठेच नाही ! गाझी जहागीरदारच शाब्दींच्या जवळचा ! मुंबईची जबाबदारी घेतलेले शाब्दि सोलापूर सांभाळणार का ?
सोलापूर : नुकतच मुंबईच्या अध्यक्षपदी निवड झालेले सोलापूर शहर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असलेले फारुख शाब्दि यांनी सोलापूर शहराचे कार्यकारिणी जाहीर केली. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पक्षामध्ये आलेले शौकत पठाण यांना मात्र शाब्दी यांनी कोणतीही संधी या कार्यकारणी मध्ये दिली नाही या ज्येष्ठ नेत्याला संधी न मिळाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
तौफिक शेख यांच्यानंतर शहराची जबाबदारी शाब्दी यांच्या खांद्यावर देण्यासाठी डेरिंग करणारा गाजी जहागीरदार याची मात्र लॉटरी लागली आहे. गाजीच्या आणि माजी नगरसेवक अझहर हुंडेकरी यांच्या खांद्यावर सोलापूर शहराच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हाजी तौफिक हत्तुरे यांची शहर उपाध्यक्ष पदावर बोळवण करण्यात आली आहे.
मोहसीन मैंदर्गीकर याची युवक अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्याच्या जागेवर याला संधी दिली आहे. मौलाली चौकातच कायम दिसणारे गाजी जहागीरदार आता शहर कार्याध्यक्ष पदाला कितपत न्याय देणार हे सुद्धा महत्त्वाचे आहे.
सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष म्हणून फारुख शाब्दि यांच्यावर जबाबदारी आहे पण त्यांनी या पदाला आजपर्यंत किती न्याय दिला हा सुद्धा संशोधनाचा विषय असून आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईचे अध्यक्ष पद आणि सोलापूरचे अध्यक्षपद ते कसे सांभाळणार याकडे लक्ष असून महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष जर सन्मानाने आघाडी करण्यासाठी आला तर करू अन्यथा स्वतंत्र लढू असा नारा शाब्दी यांनी दिला आहे.