आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नी मंत्रालयात पाठपुरावा करेन ; ऍड. सोमनाथ वैद्य यांची ग्वाही, आंदोलनकर्त्यांच्या भोजनाचीही केली व्यवस्था
सोलापूर : जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी कोळी समाजाच्या धरणे आंदोलनास आज स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक एड. सोमनाथ वैद्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवून पाठिंबा दिला. सहभागी आंदोलनकर्त्यांच्या दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था केली.
राज्यातील आदिवासी कोळी महादेव, मल्हार टोकारे, ढोर कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार
ऍड. सोमनाथ वैद्य यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शविला. कोळी समाजाच्या विविध प्रश्न आणि मागण्या मार्गी लागण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही वैद्य यांनी दिली.
दरम्यान, या आंदोलनात उपस्थित सर्व आंदोलनकर्त्यांसाठी स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्यावतीने आंदोलन स्थळी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊन उपस्थितांनी तृप्तीचा ढेकर दिला.
यावेळी सुरज खडाखडे, अभिमान घंटे, सुदाम होनकोंबडे, जगदेव कोळी, तात्यासाहेब भंडारे , राम शिंदे, दत्ता कोळी, शिवा कोळी, बाबासाहेब सोनवणे, शंकर कोळी आदींसह सकल कोळी समाज नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.