जरा हटके ! चक्क बैलगाडीतून मिरवणूक काढून युवकाने केले लग्न ; बैलाच्या वाढदिनी त्याचा असा ही सन्मान ; पहा व्हिडिओ
परिवर्तनवादी विचारांची खाण
असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अनेक गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या अन् कष्टकऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी हा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम बनवला आहे. या महाराष्ट्रात आजही महापुरुषांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून हा वारसा पुढे नेण्याचे काम सामाजिक चळवळी करीत आहेत.
धाराशिवच्या मुरूममध्ये मराठा सेवा संघात कार्यरत असणारे सावंत कुटुंबियांनी पंचांग, मुहूर्तासह विविध बाबींना फाटा देत शिवधर्म पद्धतीचा शिवविवाह सोहळा पार पाडला आहे. लग्नपत्रिका ऐवजी २४ पानांची लग्नपुस्तिका छापली. त्यात समाजप्रबोधनात्मक विविध महापुरुषांच्या कार्याविषयी लेख आहेत.
एकीकडे शेतकरी मुलांचे लग्न होत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांप्रती आदर असणाऱ्या शेतकरी नवरदेव मुलाने आपल्या विवाहासाठी घरच्या बैलाच्या वाढदिवसा दिवशी लग्नाचा बार उडवून दिला.
या लग्न सोहळ्यासाठी नवरदेव आणि नवरीला वाजतगाजत बैलगाडीतून मिरवणूक काढून मंडपात आणण्यात आलं.आणि लग्न विधी लागण्या अगोदर बैलाचा केक कापून वाढफिवास ही साजरा करण्यात आला. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याची सध्या जिल्हाभर चर्चा सुरूय.