सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून मिलिंद कांबळे यांचे नाव फायनल? कोण आहेत मिलिंद कांबळे
सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी कडून आता लातूर जिल्ह्यातील उदगीरचे मिलिंद कांबळे यांचे नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.
मिलिंद कांबळे यांना उमेदवारी निश्चित झाल्याच्या बातम्या आता प्रसारमाध्यमांमधून येत असल्याने सोलापूर मधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पद्मश्री पुरस्कार विजेते मिलिंद कांबळे हे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष आहेत. मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील रहिवासी असून पुणे येथे स्थित आहेत. ते मोठे उद्योगपती असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. मिलिंद कांबळे यांच्याच माध्यमातून stand up ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी देशांमध्ये लागू झाल्याची माहिती आहे. यापूर्वी पुण्यातून ते भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक राहिले आहेत. सिद्धाराम चाबुकस्वार हे डिक्की या संस्थेचे सोलापुरातील समन्वयक म्हणून काम पाहतात.