सोलापूरात एमआयएम पक्षाने फोडले फटाके, वाटली मिठाई ; फारुख शाब्दी यांचे लोकसभेबाबत मोठे विधान
सोलापूर : ए आय एम आय एम या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील पक्षाच्या कार्यालयासमोर शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दि यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून, मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते कोमारो सय्यद, माजी नगरसेवक गाझी जागीरदार, माजी नगरसेवक अजहर हुंडेकरी, युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गिकर, अशपाक बागवान यांच्यासह इतर पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फारूक शाब्दि यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला त्याबद्दल कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
माध्यमांशी बोलताना शाब्दी म्हणाले, पक्षाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो या 66 वर्षात कार्यकर्त्यांनी रक्ताचे पाणी करून पक्षाला मोठे केलं आहे त्यानुसारच आम्ही सर्व मिळून पक्षाला आणखी मजबूत करू सोलापुरात ही पक्षाचा आलेख वाढता आहे याबद्दल मी कार्यकर्त्यांचा आभारी आहे.
लोकसभा निवडणुकीवर बोलताना शाब्दिक म्हणाले, महाराष्ट्रातील चार जागा एमआयएम पक्ष लढविणार आहे परंतु खंत या गोष्टीची आहे की, सोलापूर हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे नाहीतर स्वतः फारूक शाब्दि या ठिकाणी उमेदवार म्हणून दिसले असते. राज्यातील सोलापूर, मालेगाव, मुंबई आणि औरंगाबाद या चार जागा एमआयएम पक्ष लढवण्याची शक्यता आहे. सोलापुरातही अनुसूचित जातीच्या उमेदवाराची चाचपणी चालू असल्याचे सांगत सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केले.