सोलापुरात राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या निवडणुकीत परिवर्तन ; राजीव साळुंखे अध्यक्ष तर अमृत कोकाटे सरचिटणीस
सोलापूर : राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूर या संघटनेच्या 2024-2029 या पंचवार्षिक कालावधीकरिता पदाधिकारी निवडणूकीत परिवर्तन पॅनलचा विजय एकतर्फी विजय झाला.
राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूर या संघटनेची सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी पदाधीका-यांची निवडणूक 29 फेब्रुवारी 2024 रोजी उजनी सभागृह, सिंचन भवन, सोलापूर येथे पार पडली.
सदर निवडणूकीत 89 मतदारांनी मतदान केले. पैकी राजीव ज्ञानदेव साळुंके, जलसंपदा विभाग व अमृत शिवाजीराव कोकाटे, सहकार विभाग यांना प्रत्येकी 58 मते मिळाली. 1 मत बाद झाली असून 30 च्या मताधिक्याने दोघेही निवडून आलेले आहेत.
तसेच खालील पदाधिकारी हे बिनविरोध निवडून आलेले आहेत.
1) कार्याध्यक्ष पदी – गजानन शरदचंद्र गायकवाड, महसूल विभाग,
2) उपाध्यक्ष पदी – 1) खंडू नामदेव भोसले, महसूल विभाग 2) मंजूनाथ जयपाल गायकवाड, समाजकल्याण विभाग,
3) महिबूब सैफन जमादार, आर.टी.ओ. विभाग
3) कोषाध्यक्ष पदी – नरेश मार्कंडेय बोनाकृती, सार्वजनिक बांधकाम विभाग
4) सहसचिव पदी – 1) दिपक दामाजी पुजारी, सोलापूर ग्रामीण पोलीस विभाग 2) नितीन खोब्राजी कसबे, सिव्हील हॉस्पीटल
5) कार्यालयीन सचिव – समीर अहमद म.शफी हुडीवाले, हिवताप विभाग
6) उपाध्यक्ष महिला – वैशाली वसंत जेधे, आय.टी.आय विभाग
परिवर्तन पॅनल विजय होण्यासाठी शंतनु गायकवाड, आणि अशोक इंदापूरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच परिवर्तन पॅनल विजय होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, सहकार विभाग, महसूल विभाग, सोलापूर जिल्हा तलाठी संघटना, भूमी अभिलेख, सिव्हील हॉस्पीटल, समाज कल्याण, वनविभाग, कार्यालयीन पोलिस कर्मचारी संघटना, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, सोलापूर, कोषागार कार्यालय, आरोग्य विभाग, कुष्ठरोग विभाग, हिवताप विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, सांख्यिकी कार्यालय, नगर रचना, दुधडेअरी, सहाय्यक कामगार आयुक्त क्रिडा कार्यालय, अन्न व औषध, धर्मादाय, जिल्हा नियोजन नगररचना, आर.टी.ओ, पशुसंवर्धन, जिल्हा मश्चविभाग, जिल्हा समन्वय समिती, मेडिकल कॉलेज, जिल्हा कृषी संघटना, आय.टी.आय, विक्रीकर, राज्य कामगार रुग्णालय, भूजलसंरक्षण, जिल्हा माहिती कार्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, स्थानिक लोकल फंड, यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. परिवर्तन पॅनलच्या विजयासाठी अहोरात्र झटणा-या कर्मचारी / पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विजयी उमेदवारांनी जाहीर आभार मानले.