प्रभाग 22 येथे डांबरीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रभाग 22 च्या सर्वांगीण विकासासाठी आणून प्रभागाचा चेहरा मोहरा बदलला. उपमुख्यमंत्री यांच्या विशेष सहकार्यामुळे लोकाभिमुख तसेच विकासाभिमुख काम करण्यास आणखीन बळ मिळत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव सांगितले.
दरम्यान प्रभाग क्रमांक 22 येथील मोदी ब्रिज ते कामिनी हॉटेल चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन 2023- 24 केंद्र शासन पुरस्कृत एनसीऐपी राष्ट्रीय स्वच्छ वायु या योजनेअंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले.
यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते डिजिटल प्रणाली द्वारे उद्घाटन करण्यात आले होते. 33 लाख 54 हजार रुपये खर्चित या रस्ता डांबरीकरणाचे प्रत्यक्ष नारळ फोडून प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांच्या हस्ते व राष्ट्रवादी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, सोलापुरातील नामवंत वळसंगकर हॉस्पिटलचे डॉ.अश्विन वळसंगकर, गंगामाई हॉस्पिटलचे डॉ.नंदित गायकवाड, सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. शिवाजी साळुंखे, भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गायकवाड, सूर्यकांत गायकवाड, चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, सचिन जाधव, निखिल गंभीरे, स्नेहल गायकवाड, आकाश पडगेकर, परशुराम दिवटे,अजिंक्य जाधव, गणेश गायकवाड, मोहित गायकवाड, जमुनाबाई जंगेकर,हुलगप्पा शासम, कास्लोकर, यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक युवक महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले.