सोलापुरात एकवीस हजार शिवभक्तांसाठी झाली भोजनाची सोय ; रात्री बारा वाजेपर्यंत पंगती ; बापूंच्या नियोजनावर कौतुकाचा वर्षाव
सोलापूर – ( प्रतिनिधी ) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्यावतीने सोमवारी राबविण्यात आलेल्या शिवभोजन उपक्रमामध्ये सुमारे २१ हजाराहून अधिक शिवभक्तांनी तृप्तीची ढेकर दिली . २१ हजाराहून अधिक शिवभक्तांना थोरला मंगळवेढा तालीमच्यावतीने मिष्ठांन्न जेवण देण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी यंदाच्या वर्षीसुद्धा शिवभक्तांना पोटभर जेवण देण्याचा उपक्रम पार पडला.
थोरला मंगळवेढा तालमीचे आधारस्तंभ आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि संकेत पिसे यांच्या शिस्तबद्ध नियोजनाच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रात्री उशिरापर्यंत जेवणाच्या पंगती सुरू होत्या.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते शिवपुजन करून तसेच शिवभक्तांना जेवण वाढून शिवभोजन उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होते. सोलापुरात शिवजयंतीच्या लक्षवेधी मिरवणुका निघतात. या मिरवणुका पाहण्यासाठी सोलापूर शहरासह आजूबाजूच्या गावातील तसेच ग्रामीण भागातील शिवभक्त सोलापुरात येतात. भर दुपारी शिवभक्त सोलापुरात येतात आणि रात्री उशिरा आपापल्या घरी जातात. मात्र घरी जाताना त्यांचे जेवणाचे आबाळ होतात. ही गैरसोय लक्षात घेऊन मंडळाचे संस्थापक अमोल शिंदे यांनी शिवाजी महाराजांच्या मिवणुकीला फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून सुरु केला .
सुरवातीस ५ हजार शिवभक्तांना आणि नंतर शिवजन्मोत्सव निमित्त शिवभक्तांसाठी आणि बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी जेवण देण्यास सुरुवात केली . मागील वर्षी ११ हजार शिवभक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यंदा २१ हजाराहून अधिक शिवभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे .मिरवणुक बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांची बंदोबस्तावेळी होणारी जेवणाची गैरसोय लक्षात घेऊन पोलीस बांधवांसाठी स्वतंत्र व्यवसस्था मंगळवेढा तालीम संघाकडून करण्यात आली होती .
सोमवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी आण्णा मठाजवळ शिवभक्तांना टेबल खुर्चीवर शिवभोजन देऊन राबविण्यात आला.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, संकेत पिसे, भाजपचे उदयशंकर पाटील, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. दीपाली काळे, भगीरथ भालके, तुकाराम मस्के, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, राजेंद्र हजारे, ठाणे शिवसेना विभाग प्रमुख दिनेश मलपे, कपिल पिसे, दास शेळके, विकास गायकवाड, सायबण्णा तेगेळी, अनिकेत पिसे, सागर पिसे, विनायक महिंद्रकर, सुशील बंदपट्टे, जयश्री पवार, हरिभाऊ जाधव, शिवदास चटके, के. डी, कांबळे, प्रशांत बाबर, संतोष माळी, हरीभाऊ चौगुले, सचिन चव्हाण, अमोल कदम, समीर लोंढे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने सोलापूर शहरात निघणाऱ्या जल्लोषपूर्ण मिरवणूका पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना जेवन देताना ते अत्यंत सात्विक असावे या दृष्टीने मंडळाचे संस्थापक अमोल बापू शिंदे यांनी उत्तम नियोजन केले .जेवणाच्या ताटात पुरी ,दोन भाज्या, मसाला भात आणि गोड शिरा हा मेनू देऊन शिवभक्तांनी या शिवभोजनाचा लाभ घेतला. सुमारे २१ हजाराहून अधिक शिवभक्त या भोजनाचा लाभ घेणार असल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच आचारी मंडळींनी स्वयंपाक तयार करण्यासाठीची लगबग सुरू होती.