ब्रेकींग : उज्वला सोरटे उत्तर सोलापूरच्या नव्या तहसीलदार ; उत्तरला मिळाल्या पहिल्याच महिला तहसीलदार
सोलापूर : यापूर्वी सोलापुरात तहसीलदार सर्वसाधारण आणि अप्पर तहसीलदार मंद्रूप या ठिकाणी कामकाज पाहिलेल्या तहसीलदार उज्वला सोरटे यांची उत्तर सोलापूरच्या तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 15 तहसीलदारांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये रिक्त असलेल्या उत्तर सोलापूरच्या तहसीलदार पदी उज्वला सोरटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तहसीलदार सैफन नदाफ यांच्या बदलीनंतर उत्तर सोलापूरचे तहसीलदार पद रिक्त होते त्यामुळे त्यांच्या जागेवर कोण येणार? अशी चर्चा होती उत्तर सोलापूरचा तहसीलदार म्हणजे संपूर्ण सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुका या भागाचे कामकाज पहावे लागते. त्यामुळे या पदाला सोलापूर शहरात अतिशय महत्त्व आहे.
यापूर्वी सोरटे या मुख्यालयात तहसीलदार सर्वसाधारण पदावर होत्या. त्यानंतर तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंद्रूप या ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय निर्माण केले त्या अप्पर तहसीलदार पदी प्रथमच उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली. दरम्यान त्यांची बदली सातारा या ठिकाणी झाली नंतर त्या दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार पदी त्यांची नियुक्ती झाली, मात्र काही अशा घडामोडी घडल्या की त्यांच्या जागेवर किरण जमदाडे यांची तहसीलदार पदी नियुक्ती झाली. या बदलीच्या ऑर्डर मध्ये उत्तर सोलापूरच्या तहसीलदार पदी उज्वला सोरटे यांची नियुक्ती झाली आहे.