ब्रेकिंग : महिला सरपंच व तिचा पती अँटी करप्शनच्या जाळ्यात ; दहा हजाराची घेतली लाच
सोलापूर : सभा मंडपाचे कामाचे बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून दहा हजाराची लाच घेणाऱ्या सांगोला तालुक्यातील आलेगावच्या महिला सरपंच व तिच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगीहात पकडले.
पांडुरंग रामचंद्र दिवसे, वय 51 वर्ष, खाजगी इसम (महिला सरपंच यांचे पती) राहणार आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व नंदाबाई पांडुरंग दिवसे वय 43 वर्षे पद- सरपंच मौजे आलेगाव ग्रामपंचायत ता. सांगोला असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांना मौजे आलेगाव मधील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभा मंडपाचे काम मिळाले होते. सदरचे काम तक्रार यांनी पूर्ण केल्याने त्या कामाची बिल मिळणे बाबत ग्रामपंचायत येथे पाठपुरावा करत असताना मोजे आलेगावचे महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडे ८००० रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारीदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीबाबत अँटी करप्शन ब्युरो, सोलापूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि.१७.०१.२०२४, दि. २३.०१.२०२४ व दि. २९.०१.२०२४ रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता, यातील आरोपी पांडुरंग रामचंद्र दिवसे ( महिला सरपंच यांचे पती) यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे २००० रुपये व सध्याच्या कामाचे ८००० रुपये असे एकूण १०००० रुपये लाचेची मागणी केली. सदर बाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता, त्यांनी सदरची लाच रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे दि. १५.०२.२०२४ रोजी यातील तक्रारदार यांनी महिला सरपंच यांचे पती यांची भेट घेऊन बिलाचा विषय काढला असता महिला सरपंचाचे पती यांना तक्रारदार यांच्याकडून १०,००० रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यावरून सांगोला पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे