सोलापुरातून 200 मुस्लिम बांधव अजमेरकडे रवाना ; आमदार प्रणितीताईंनी दुवा करण्याचे केले आवाहन
सोलापूर : शहरातील जरीया फाउंडेशन आणि सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे युवक अध्यक्ष नजीब शेख यांच्या वतीने शहरातील 200 मुस्लिम बांधवांना अजमेर शरीफच्या दर्शनासाठी रवाना करण्यात आले.
किडवाई चौकातील केएमसी गार्डन या ठिकाणी नुरानी मशीदच्या नवीन ट्रस्टींचा सत्कार आणि अजमेर शरीफ दर्गा साठी जाणाऱ्या बांधवांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी यावेळी उपस्थिती लावून उपस्थित बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जरीया फाउंडेशनचे अध्यक्ष नजीब शेख यांनी तब्बल दोनशे किलोचा हार सर्व बांधवांच्या सत्कारासाठी आणला होता.
प्रणिती शिंदे म्हणाल्या अजमेर शरीफ दर्गा मध्ये अनेकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, मी अनेक वेळा या ठिकाणी गेले आहे सध्या देशातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे मुस्लिम, अल्पसंख्यांक, मागासवर्गीयांच्या विरोधात आहे, देशात पुन्हा अमन आणि शांती आणण्यासाठी काँग्रेसचे सरकार यावे अशी प्रार्थना करावी असे आवाहन केले.
जरीया फाउंडेशनच्या अध्यक्ष नजीब शेख यांनी या कार्यक्रमामधील उद्देश स्पष्ट करताना देशातील मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण आहे ते दूर करायचे असेल तर निश्चितच भाजपला सत्तेपासून बाजूला सारले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.