जिल्हा लेबर फेडरेशनची अखेर निवडणूक लागली ; दहा जागा बिनविरोध ; आठ जागेसाठी हे आहेत उमेदवार
सोलापूर : सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या 18 संचालक जागेसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा या बिनविरोध झाल्या असून आठ जागेसाठी निवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता.
जिल्ह्यातील नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या कार्यालयातून दिवसभर सूत्रे हलवली. सोलापूर शहरातील दोन जागा, उत्तर सोलापूर एक, दक्षिण सोलापूर एक, यासह मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट, बार्शी, करमाळा या जागा बिनविरोध करण्यात माने यांना यश आले. त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र त्या त्या तालुक्यातील गटबाजीमुळे अखेर ही निवडणूक लागली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातून मुजम्मील शेख यांना बिनविरोध करण्यात काँग्रेस नेते सुरेश हसापुरे यांनी मोठा वाटा उचलल्याचे दिसून आले.
बिनविरोध झालेल्या सर्वसाधारण जागेमध्ये
सोलापूर शहर – शंकर चौगुले, चंद्रकांत आवताडे,
दक्षिण सोलापूर – मुजम्मिल हुसेन शेख
उत्तर सोलापूर- राजू हरिश्चंद्र सुपाते
मोहोळ -शिवाजी चव्हाण
मंगळवेढा -श्याम पितांबर पवार
अक्कलकोट -रोहिदास राठोड
करमाळा -मानसिंग नारायण खंडागळे
बार्शी -अरुण वामनराव घोडके
भटक्या विमुक्त जाती जमाती
संजय नामदेव साळुंखे
सर्वसाधारण जागेमध्ये माढा, सांगोला, पंढरपूर व माळशिरस या चार जागेसाठी निवडणूक लागली असून माढा मतदारसंघातून यशवंत भारत शिंदे व प्रियदर्शन अण्णासाहेब साठे, सांगोला मधून अंकुर भीमा येडगे व बाबासाहेब रामचंद्र करांडे, माळशिरस मधून नितीन चंद्रकांत शिंदे, अरुण भगवान थिटे, पंढरपूर मधून रेश्मा संजय साठे, पुनम राहुल कौलगे पाटील, बाळासाहेब जालिंदर बागल यांच्यात लढत होत आहे.
महिला प्रवर्गाच्या दोन जागेसाठी सरस्वती अनंत साठे, रेश्मा संजय साठे, पुनम राहुल कौलगे पाटील व पार्वती विजय गाडे हे चार उमेदवार रिंगणात आहेत.
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील एक जागेसाठी सदानंद श्रीपती फुले व वसंत कुबेर क्षीरसागर हे दोन उमेदवार उभे आहेत तर अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी लक्ष्मण कामू मस्के व रमेश घनश्याम वाघमारे यांच्यात लढत होत आहे.
या निवडणुकीसाठी येत्या 18 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक आबासाहेब गावडे हे काम पाहत आहेत.