सोलापूर । राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ओबीसी प्रदेश उपाध्यक्षपदी बशीर शेख (इंगळगी, ता. दक्षिण सोलापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील कार्यक्रमात नियुक्तीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आले.
ही निवड प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या मान्यतेने करण्यात आली. बशीर शेख हे गेल्या ५ वर्षापासून सक्रिय राजकारणात असून ते इंगळगी ग्रामपंचायत सदस्य आहेत. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रीय सचिव शिवाजीराव गर्जे, युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महासचिव सुबोध मोहिते आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.