राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाडने प्रभू श्रीरामचंद्र यांच्याबाबतीत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल भाजपने गुन्हा दाखल करण्याची जोडभावी पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे.
वारंवार हेतुपुरस्पर हिंदूंच्या भावना दुखावण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत असून,शिर्डी येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या बाबतीत राम मांसाहारी होता अशा प्रकारचे अवमानकारक वक्तव्य केले होते या वक्तव्याचा निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे जितेंद्र आव्हाडांवर हिंदूंचे भावना दुखावल्या बाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली .
याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे,अनुसूचित मोर्चाचे अशोक खटके,भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य सागर अतनुरे, भीमराव आसादे,भाजयुमो शहर चिटणीस ओंकार होमकर,नरेश ताटी,राजू चौगुले,अर्जुन मोहिते,आदींनी केली.
याप्रसंगी बोलताना प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे म्हणाले,जितेंद्र आव्हाडने केलेलं वक्तव्य जाणीवपूर्वक असून,त्यांनी आमच्या श्रद्धास्थान असणाऱ्या रामचंद्राबाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.
भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी निषेध करताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य हे जाणूनबुजून केलेलं असून 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होत असताना अशा प्रकारचे वक्तव्य करणे सामाजिक शांतता बिघडविण्याचे काम असून या वक्तव्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत अशा बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या बेजबाबदार व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा असे प्रतिपादन अक्षय अंजिखाने यांनी केले.
भाजप निमंत्रित सदस्य सागर अतनुरे यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्य हे त्यांच्या सडक्या बुद्धीचे प्रदर्शन असून,जाहीर माफी जर जितेंद्र आव्हाड ने मागीतली नाही तर,त्याला महाराष्ट्र राज्यात काय त्याच्या घराबाहेर येणे देखील मुश्किल होईल असे प्रतिपादन केले.