सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेतील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे अक्षता सोहळा. या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थिती लावतात. मंदिरासमोरील एका बाजूचा रस्ता पक्का झाला आहे परंतु दुसऱ्या बाजूला असलेला रस्ता अद्यापही झालेला नाही कारण वक्फ बोर्डाच्या असलेल्या मतभेदांमुळे तो रस्ता राहीला होता.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून आता वक्फ बोर्डाने हा रस्ता करण्याला परवानगी दिली आहे अशी माहिती स्वतः पालकमंत्री दादांनी दिली. यात्रेपूर्वी महानगरपालिकेने हा रस्ता स्वखर्चातून पूर्ण करावा. त्या रस्त्याला जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी रुपये निधी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत दादांनी केली आहे.