महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यांच्या निवडी शनिवारी दुपारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये केल्या जाणार आहेत यामध्ये एम आय एम पक्षाकडून एक सदस्य निवडला जाणार आहे एम आय एम पक्षामध्ये सध्या दोन गट असून एक गट हा शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांचा आहे तर दुसरा गट हा तोफिक शेख यांचा आहे तोफिक शेख यांच्याकडे 6 आहेत तर शाब्दी यांच्याकडे केवळ वाहिदा भंडाले या एकमेव महिला नगरसेविका आहेत गटनेते रियाज खरादी हे मात्र तळ्यात ना मळ्यात असतात संधिसाधू राजकारण ते करत असल्याचे चित्र आहे गटनेता असल्याने त्यांचा या स्थायी समिती सदस्य निवडीत फुकटचा भाव वाढला आहे त्यांच्या लेटरपॅडवर ज्याचं नाव असेल त्याला स्थायी समिती मध्ये सदस्यत्व मिळणार आहे नगरसेवक अझहर हुंडेकरी हे तोफिक शेख यांच्याकडे पण नाहीत आणि शहराध्यक्ष फारुक शाब्दि यांच्या ही सोबत दिसत नाहीत ते थेट हैदराबादच्या पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत आता एमआयएम कडून कोणाला सदस्यत्व द्यायचं हा गोंधळ सुरू आहे गटनेता रियाज खरेदी यांनी मागील दोन दिवसांपासून आपला फोन स्विच ऑफ केला आहे ते कुणालाही भेटत नसल्याचं ऐकण्यास मिळाले फारुक शाब्दी हे स्थायी समितीसाठी कोणाला संधी देतात याची उत्सुकता आहे , ते वहिदा भंडाले यांना संधी देतात की अहजर हुंडेकरी यांना संधी देतात हे शनिवारी दहापर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे ,तोफिक शेख यांच्यासोबत तसलीम शेख वाहिदाबी शेख वाहिदाबानू शेख पूनम बनसोडे नूतन गायकवाड हे सहा सदस्य आहेत आता या सहा पैकी कुणाची निवड स्थायी समिती सदस्य साठी होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत सोलापूर महापालिकेच्या स्थायी समिती निवड 5 वर्षातून केवळ दुसऱ्यांदा होत आहे सुरुवातीला केवळ एकच वर्ष स्थायी समिती गठीत झाली त्यानंतर मात्र सभापती निवडीत गोंधळ झाला आणि हे प्रकरण न्यायालयात गेले त्यामुळे तीन वर्ष समिती झालीच नाही आता शेवटचा वर्षे राहिला आहे स्थायी समिती होत असल्याने सदस्य निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे, एमआयएम मध्ये कोण बाजी मारते हे मी शनिवारी सभेच्या अगोदर स्पष्ट होणार आहे गटनेते रियाज खरादी यांनी फोन बंद केल्याने त्यांच्यावर तौफिक शेख हे नाराज असल्याचं ऐकण्यास मिळालं.