सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना सोमवार सकाळ पासून कणकण होती, तरीही त्यांनी जिल्हा परिषद मध्ये काही महत्वाच्या बैठकांना हजेरी लावली, मंगळवारी सकाळी ही एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग असल्याने ते कार्यालयात आले होते मात्र त्रास होऊ लागल्याने ते लगेच आपल्या निवासस्थानी गेले त्यांनी लगेच आपली कोरोनाची टेस्ट केली, या टेस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आले , डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते आता होम आयसोलेट व्हायचे की हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायचे ते ठरवतील, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी लगेच आपले कार्यालयीन सहकारी यांना कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले त्यांचे स्वीय सहाय्यक, बॉडीगार्ड पोलीस, वाहन चालक यांनी आपली चाचणी केली मात्र सर्वजण निगेटिव निघाले, मागील अडीच ते तीन महिन्यापासून त्यांनी खूप झोकून देऊन काम केले, कार्यालयात ते थांबत नसत सलग तालुके दौरे करत होते, आल्यापासून समन्वय सभा सुरू केल्या, ग्रामसेवक, शिक्षक संघटना, विस्तार अधिकारी, कर्मचारी संघटना, कास्ट्राईब संघटना यांच्या बैठका लावून अनेक प्रश्न मिटवले, सेवापुस्तक अद्ययावत करणे, जिल्ह्यात माझे गाव, कोरोनामुक्त गाव अभियान सुरू केले, या धावपळीत त्यांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष दिले नाही, शेवटी ते कोरोना पॉझिटिव्ह झालेत, बुधवारी पालकमंत्री दत्तामामा भरणे हे कोरोनाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक घेणार आहेत, त्या बैठकीला आता जिल्हाधिकारी सह मुख्य कार्यकारी अधिकारी हे महत्वाचे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत.