काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची महाराष्ट्र विधिमंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली, या निवडीनंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी मुंबई नागपूर मध्ये समितीच्या महत्त्वाच्या बैठका घेतल्या, प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी सामाजिक न्याय भावना मधील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयात अनुसूचित जाती कल्याण समितीची बैठक लावली आहे, समितीच्या बैठकीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी व सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनाचा आढावा घेतला जाणार आहे यासह योजनांचे संगणकीय सादरीकरण करण्यात होणार आहे ,
या बैठकीमध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागावर्गीय विकास महामंडळ, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे, बार्टी अंतर्गत यूपीएससी व एमपीएससी अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे या प्रयत्नशील आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कार्य पत्रिकेवरील अनुसूचित जाती उपयोजनावर कोणतीही चर्चा झाली नाही राज्यात अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो मात्र तो कितपत खर्ची पडतो ही माहिती समोर येत नाही किंवा याची चर्चाही होत नाही शुक्रवारी आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत सामाजिक न्याय विभागात सुरू असलेल्या कामकाजाचे चित्र समोर येणार आहे.