कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याकरिता १६ जानेवारीपासून लसीकरणाची मोठी मोहीम देशभरात सुरू आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला असून सोमवारपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतल्याचे समोर आले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर त्यांनी आपल्या फेसबुकवर
कोविड -19 लसची माझी पहिली डोस एम्समध्ये घेतली.
कोविड -19 विरुद्धच्या जागतिक लढाईला बळकट करण्यासाठी आपल्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी द्रुत वेळात कसे कार्य केले हे उल्लेखनीय आहे.
मी लस घेण्यास पात्र असलेल्या सर्वांना आवाहन करतो. एकत्रितपणे आपण भारत कोविड -19 मुक्त करूया!