सोलापूरातील डॉ वैंशपायन मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर सध्या चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे, ते कायम वादग्रस्त राहिले असून आता तर त्यांच्यावर वेगवेगळे गंभीर आरोप होऊ लागले आहेत, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बेजबाबदार पणाचे अनेक पुरावे समोर आले आहेत, वृत्तपत्रातून तशा बातम्या छापून आल्या आहेत. कोविड काळात सिव्हिल हॉस्पिटल वर सर्वाधिक भर होता अशावेळी सिव्हिल मध्ये जागा कमी पडू लागली त्यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर औदुंबर म्हस्के यांनी सिव्हिलची सद्यस्थिती सोशल मीडियावर आणली याच वेळी आपले पितळ उघडे पडते म्हणून अधिष्ठाता ठाकूर यांनी मस्के यांच्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली मात्र सर्व मीडिया मस्केच्या बाजुनी एकवटली, यामध्ये डॉक्टर ठाकूर तोंडघशी पडले .एकीकडे संपूर्ण शहर आणि जिल्ह्याचे प्रशासन कोरोनाशी लढा देत असतानाच दुसरीकडे डॉक्टर संजीव ठाकूर सुट्टी टाकून निघून गेले हा हलगर्जीपणाचा कळस होता अशी त्या वेळी चर्चा झाली मीडियातून जोरदार टीका झाल्यानंतर तब्बल दीड ते दोन महिन्यांनी ठाकूर कामावर रुजू झाले आता ठाकूर यांच्याकडून सिव्हिल मधील मागासवर्गीय अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे उदाहरण मागासवर्गीय संघटनांनी निवेदन दिल्यानंतर समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका दैनिकांमध्ये डॉक्टर संजीव ठाकूर यांची पोलखोल करणारी मालिका छापून आली, त्याचा राग ठाकूर यांनी डॉक्टर औदुंबर मस्के यांच्यावर काढला मस्के यांनीच ही माहिती दिल्याचे संशय व्यक्त करून त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत यामध्ये डॉक्टर औदुंबर मस्के यांचे वैद्यकीय अधीक्षक पद काढण्यात आले त्यांना सफाई अधीक्षकांची खालची पोस्ट देण्यात आली एवढ्यावरच न थांबता ठाकूर यांनी त्यांना सध्या कामावरून कमी केल्याची माहिती आहे ,
सोमवारी संभाजी आरमार संघटनेने निवेदन दिले त्यामध्ये अधिष्ठाता डॉ ठाकूर यांचा मुलगा डॉक्टर अमेय ठाकूर हा गोर-गरीब रुग्णांवर बेकायदेशीरपढे शस्त्रक्रियेचे प्रयोग करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे तो अनेकांच्या जीवाशी खेळ खेळतो अधिष्ठाता यांचा मुलगा असल्याने त्याला भीतीने कोणी बोलत नाही, त्याची सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दंडेलशाही चालत असल्याचा आरोप संभाजी आरमारने केला आहे. बेकायदेशीरपणे तसेच बळजबरीने शस्त्रक्रिया करत असल्याचा व्हिडिओ काही जणांच्या हाती लागला असून तो येत्या काही दिवसात व्हायरल होणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे . सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यांमध्ये कोरूना चे रुग्ण वाढत चालले आहेत दिवसाला सरासरी 80 रुग्ण वाढत आहेत सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सध्या सुमारे 75 ते 80 रुग्ण उपचार घेत आहेत ए ब्लॉक मध्ये या रुग्णांवर उपचार सुरू असून कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता या ठिकाणी पाहायला मिळते ऑगस्ट 2020 मध्ये सुमारे 58 कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती झाली होती त्यामध्ये मामा, नर्स, एक्स-रे टेक्निशियन, ईसीजी टेक्निशीयन यांचा समावेश होता मात्र त्यांना डिसेंबर महिन्यात कमी करण्यात आले नोव्हेंबर आणि डिसेंबरचा त्यांचा अद्यापही पगार दिला गेला नाही ते कर्मचारी कामावर घेण्यासाठी रोज अधिष्ठाता कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद या ठिकाणी फेऱ्या मारतात ना त्यांचा पगार दिला जातोय ना त्यांना कामावर घेतले जाते कोरोना रूग्णांसाठी नव्याने बी ब्लॉकचा एक मजला सुमारे शंभर बेडचा तयार करण्यात आला होता मात्र तो सुद्धा आता बंद करण्यात आल्याची माहिती आहे. ए ब्लॉकमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने बरा झालेला रुग्ण बी ब्लॉकमध्ये हलवला जातो मात्र त्यांना घेऊन जाण्यासाठी कर्मचारी नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलत घेऊन जावे लागत असल्याची परिस्थिती सध्या सिव्हीलमध्ये आहे, एकीकडे पालकमंत्री सर्व कोविड हॉस्पिटल कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा सूचना देतात दुसरीकडे मात्र तब्बल पाच महिने कोवीड हॉस्पिटलमध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कमी केले जाते त्यांची काम करण्याची इच्छा असूनही त्यांना कामावर घेतलं जात नाही या प्रकरणात अधिष्ठाता संजीव ठाकूर यांची जबाबदारी असतानाही ते आपली ही जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. आपल्या पुत्र प्रेमापोटी ते अजून काय काय करणार आहेत असा प्रश्न सोलापूरकरांना पडला असून त्यांना नेमके अभय कुणाकडून मिळत आहे याचीही चर्चा आता होऊ लागली आहे.