सोलापूर : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य खुला गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा 2023 सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने इच्छा भगवंताची मंडळ व सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमानाने 22 जुलै ते 25 जुलै 2023 दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती किसन जाधव यांनी दिली.
शंकर भवन मंगल कार्यालय उदय विकास शाळेच्या समोर लिमेवाडी सोलापूर या ठिकाणी सोलापूर जिल्हास्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आकर्षक रोख बक्षिसे व अजित दादा चषक असे ठेवण्यात आले आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघाने या स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसाचे मानकरी व्हावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
पुरुष गटासाठी प्रथम क्रमांकासाठी 20063 रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये व चषक तसेच महिलांसाठी प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांक साठी पाच हजार रुपये व चषक तसेच उत्कृष्ट पक्कड़ 1000 रुपये रोख उत्कृष्ट चढाईसाठी एक हजार रुपये असे आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 22 जुलै 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार संजय मामा शिंदे हे राहतील तसेच या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
22 जुलै रोजी प्रभागातील मनपाच्या रामवाडी प्रसूती ग्रहांमध्ये जेवढे प्रसूती होतील त्या बालकांच्या नावाने पाच हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून बँकेत ठेवण्यात येणार आहे. ही रक्कम अठरा वर्षासाठी ठेवून त्याचे प्रमाणपत्र त्या बाळाच्या मातेला देण्यात येणार आहे.
शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. ज्या योजनांचा लाभ गरजूंना मिळतो अशा सर्व योजनांचा शुभारंभ प्रभागात करण्यात येणार आहे. याचा या प्रभागातील प्रत्येक गरजू व्यक्तीला लाभ होईल असे जाधव यांनी सांगितले.