तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर येथे सन 2023 मध्ये करण्यात येणाऱ्या कोतवाल भरती आरक्षण सोडत 20 जुलै रोजी प्रांताधिकारी मनिषा आव्हाळे यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर या ठिकाणी संपन्न झाला. कोतवाल या पदासाठी मागासवर्गीय कक्ष,पूणे यांचे मंजूर बिंदुनामावलीनुसार 9 पदे रिक्त होते. शासन निर्णय नुसार 9 पदाच्या 80 टक्के प्रमाणे एकूण 7 कोतवाल पदाची प्रवर्गनिहात आरक्षण सोडत काढण्यात आला.
यावेळी कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी सोलापूर क्रं.२ मनीषा आव्हाळे, दक्षिण तहसीलदार तथा सदस्य सचिव राजशेखर लिंबारे, आर.बी. भंडारे निवासी नायब तहसिलदार, डि.एफ. गायकवाड, महसूल नायब तहसिलदार, विठ्ठल बी.जाधव निवडणूक नायब तहसिलदार, आरती दबाडे संजय गांधी नायब तहसिलदार, किरण फुले, परिविक्षाधीन नायब तहसिलदार, अव्वल कारकून पुरुषोत्तम शिंदे तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
*अंतिम निश्चित झालेले आरक्षण सोडत खालील प्रमाणे*
१)अनुसूचित जाती (महिला).- वळसंग
२) अनुसूचित जमाती – वडकबाळ
३) भटक्या जमाती (ब) – मुस्ती
४) भटक्या जमाती (ड)- हत्तुर
५) इतर मागास प्रवर्ग – बोरामणी
६) आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटक – तोगराळी
७) अनुसूचित जमाती (महिला)- सिंदखेड