कुंभारी इथल्या माळरानावर 30 हजार कष्टकऱ्यांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण होत आहे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याठिकाणी येऊन या गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते, आता पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे पूर्ण होत आहेत, पुढील वर्षी त्यांना घरे वाटप होतील, त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रशासन रात्र आणि दिवस रे नगर साठी मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत,
बैठका घेत आहेत, असे सांगत माजी आमदार आडम मास्तरांनी असा मिलिंद शंभरकर यांच्या सारखा जिल्हाधिकारी मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही, मुलांच्या शाळेसाठी तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत इतर सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचं सहकार्य मिळत आहे, मंत्रालय स्तरावरून सर्व आयएएस अधिकारी सहकार्य करताहेत, जिल्हा प्रशासन या लाभार्थ्यांना सर्व दाखले मिळावेत यासाठी प्रयत्न करीत आहे, एकीकडे असे सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली असताना दुसरीकडे सोलापूर महापालिका आयुक्त पी शिवशंकर हे मात्र जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या भूमिकेत आहेत,
केंद्र आणि राज्याचे 200 कोटी रुपये आले असताना ते घर मालकांच्या आधारकार्डची मागणी करत आहेत, म्हाडाला मनाई आदेश देण्याचा अर्ज केलाय, आता घरमालक आधारकार्ड कुठले देणार? आम्ही जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले पाहिलेत, आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पहात आहोत पण असा सुलतानी कायदा लावणाऱ्या पी शिवशंकर सारखा अधिकारी नाही पाहिला, पण शिवशंकर गाठ माझ्याशी आहे,
9 ऑगस्ट रोजी मी येत आहे, इंद्राभुवनवर 30 हजार लोकांना आणणार, आमच्यावर काठ्या पडल्या तरी बेहत्तर अशा शब्दात आडम यांनी आयुक्त शिवशंकर यांच्यावर तोफ डागली. हा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये प्रस्तावित होता आम्ही रीतसर पैसे भरून परवानगी घेतली मात्र आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी आणा सांगितले, महापालिका क्षेत्रात निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार आयुक्तांना दिले असताना जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची गरज काय मास्तर तुम्ही साईटवर कार्यक्रम घ्या असे शंभरकर यांनी सांगितले.




















