सोलापूर : लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराचे वितरण रविवारी किर्लोस्कर सभागृहात करण्यात आले.
डॉ के एम भांडारकर हे प्रमुख पाहुणे ऑनलाइन जॉईन झाले होते, व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख,शहाजी पवार,डॉ. हो. ना. जगताप, आशालता जगताप, तज्ञ संचालक हरिश्चंद्र गवळी लोकमंगल पतसंस्थेच्या सर व्यवस्थापिका अलका देवडकर, उपसभापती जयश्री भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते तानाजी शिंदे, डॉ. विकास काळे, रत्नमला हुरणे ,वनिता जाधव, अंबू गुळवे, संजय जवंजाळ ,मच्छिंद्रनाथ नागरे ,विजय वडरे, महादेव सावता, सुप्रिया शिवगुंडे यांना लोकमंगल पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी ऑनलाइन मार्गदर्शन करताना डॉ भांडारकर यांनी आजकाल इंटरनेट वर खूप काही वाचायला मिळत मात्र ते ज्ञान नाही ती केवळ माहिती आहे आणि ज्ञान हे शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना मिळते, वर्गात कोणतंही गणित विद्यार्थी सोडवतो मात्र आयुष्याच गणित सोडवण्यात तो अपयशी ठरतो, म्हणूनच शिक्षणासोबत जगण्याचे ज्ञान सुद्धा शाळेतून मिळणं अत्यंत आवश्यक असल्याचं भांडारकर म्हणाले.👇👇👇👇👇
पहा काय म्हणाले डॉ के एम भांडारकर
आमदार सुभाष देशमुख म्हणाले, शिक्षक हे सोलापूर जिल्ह्याची ताकद आहे, ते विद्यार्थी घडवण्यासोबतच जिल्ह्याचे चांगले मार्केटिंग सुद्धा करू शकतात, सोलापूर जिल्ह्यात काय नाही? पर्यावरण समृद्ध जिल्हा आहे, देवस्थान मोठ्या प्रमाणात आहेत, पण देशाच्या नकाशावर मार्केटिंग का होत नाही, शिर्डी गाव हे छोटे असले तरी देशाच्या नकाशावर आहे, तिथे देशातून लोक येतात, पण आपल्याकडे स्वामी समर्थ आहेत, पांडुरंग आहेत, संत दामाजी आहेत, ग्रामदैवत सिद्धेश्वर आहेत, आपण मागे का?याची चांगली मार्केटिंग शिक्षक करू शकतात आपण सर्वांनी मिळून केले तर होऊ शकते, जिल्ह्याचे आगळेवेगळे वैभव देशासमोर येईल.👇👇👇👇
पहा काय म्हणाले सुभाष देशमुख आपल्या भाषणासत
सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी तर आभार प्रदर्शन युवराज गायकवाड यांनी केले.


















