सोलापूर जवळील बक्षीहिप्परगा या गावा लगत असलेल्या सेतुपुलावर प्रत्येक पावसाळ्यात मोठया प्रमाणात पाणी येते वाहतूक बंद होते.
अपघात घडतात मागील वर्षी अशीच घटना घडली होती रविवारी सकाळी 9 वा बैलगाडी सेतुपुलावरून जात असताना अचानक पाण्याचा मोठया प्रमाणात लोंढा आला आणि बैलगाडी ही त्या प्रवाहात वाहून गेली दोन्ही बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे,
ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी खुप वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना मोठा पूल मंजूर व्हावा म्हणून निवेदने दिलेली आहेत. या रस्त्यावर 10 गावे आहेत मराठवाड्याला व सोलापूर शहराला जोडणारा हा रस्ता आहे. आज मोठया प्रमाणात ग्रामस्थांनी या रस्त्यावरच्या मोठया पुलाची मागणी केलेली आहे,
मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देखील तात्काळ शेतकऱ्यांस मदतीचे आवाहन व लवकरच त्या रस्त्यावर मोठा पूल मंजूर करणेसाठी मी स्वतः प्रयत्नशील असल्याचे ग्रामस्थांना सांगितले आहे तसेच तहसीलदार अमोल कुंभार यांनी देखील पाहणी करून शेतकऱ्यांस शासन मदतीचा हाथ पुढे केला असून पूल व्हावा यासाठी प्रशासन देखील शासनाकडे पाठपुरावा करेल असे त्यांनी सांगितले आहे.

















