मोहोळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून राज्यातील मशिदीवर असलेल्या भोंग्यांवरून चांगलेच राजकारण तापवले आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर ही जोरदार टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी मोहोळ तालुक्यातील अनगर येथील एका कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता थेट टीका केली, यांना स्वतःचे 14 आमदार टिकवता आले नाहीत नाशिककरांनी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात दिली मात्र नंतर त्याच नागरिकांनी त्यांना नाकारले आता हेच लोक राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही खटाटोप करत आहेत हे आपणाला परवडणारे नाही अशांपासून तुम्ही सावधान रहा या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली…

















