सोलापूर : एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी सोलापुरात मोठे विधान केले आहे. अचानकच महाराष्ट्रात हे भोंग्याचे मुद्दे का आले विचार करण्याची वेळ आहे. मला वाटते संपूर्ण देशात केवळ एमआयएम पक्ष आहे जी सर्वाना सोबत घेऊन जात आहे, औरंगाबाद मध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीला निमंत्रण दिले, सोलापुरात रोजा इफ्तार पार्टी ला सर्व समाज सर्व पक्षाच्या प्रतिनिधींना बोलावले जाते. सर्वात सेक्युलर व पिसफुल पार्टी जर कुणी असेल ती पतंगछाप एमआयएम असून विरोधी पक्ष काही बोलु द्या आम्हाला फरक पडत नाही.पहा व्हिडीओ


















