मुंबई – डॉ धवलसिंह मोहिते पाटील हे सोलापूर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्या दोन-तीन महिन्यात त्यांनी जिल्ह्यात झंझावाती दौरे केले, आढावा बैठका घेतल्या, मेळावे घेतले, मरगळलेल्या कॉंग्रेस पक्षाला ग्रामीण भागात ऊर्जा दिली मात्र आता मागील काही महिन्यांपासून त्यांचं जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये लक्ष कमी झाल्याचे चित्र आहे. सोलापुरातील काँग्रेस भवनात त्यांचं येणं सुद्धा कमी झाल्याचं दिसत आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या काही हौशी पदाधिकाऱ्यांनी धवलसिंह मोहिते-पाटील यांची शासनाच्या कोणत्याही महामंडळावर अध्यक्षपदी वर्णी लावावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले हे सुद्धा याबाबत सकारात्मक असुन लवकरच गोड बातमी देऊ असे आश्वासित केले आहे असे सांगण्यात येते.
याबाबत प्रेस नोट जेव्हा सर्व माध्यमांना देण्यात आली, त्याच्या बातम्या छापून आल्या, त्या फोटोमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रदेश प्रवक्ते मनोज कुलकर्णी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्यासह ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट पल्लवी रेणके या होत्या. दरम्यान एडवोकेट पल्लवी रेणके यांनी याप्रकरणात ओबीसी विभाग सोलापूर या व्हाट्सएप ग्रुपवर प्रतिक्रिया दिली …ती प्रतिक्रिया स्क्रिन शॉट करून व्हायरल झाली आहे. काय म्हणाल्या रेणके….पहा👇👇👇
“डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्हा ग्रामीणला लाभलेले एक उमदे व क्रियाशील नेतृत्व आहे. त्यांना सत्तेमध्ये सामावून घेतल्यास अतिशय प्रभावीपणे काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी होईल यामध्ये दुमत नाही. त्यामुळे श्री. विजयकुमार हत्तूरे यांच्या मागणीला पाठींबा आहे”…… असे लिहून पुन्हा रेणके यांनी खालच्या बाजूला पहा काय लिहिले आहे ते👇👇👇
परंतु, सदर फोटो हा माझ्या माहितीप्रमणे या मागणीसाठीच्या निवेदन देण्यासाठीचा नाही. फोटो काढताना या बाबतीत मला कोणतीही कल्पना नव्हती. मा. नानाभाऊ यांच्याकडे भटक्या विमुक्तांच्या संघटनात्मक बांधणीसाठी माझी व इतर पदाधिाऱ्यांची असलेली बैठक संपल्यानंतर जाता जाता काढलेला हा फोटो आहे. सर्वच सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की अशा प्रकारची बातमी करताना मला विश्वासात घेण्यात यावे अथवा गैरसमज होऊ व पसरू शकतात.- अॅड. पल्लवी रेणके

















