सोलापूर : जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व आवश्यकतेनुसार लाभ एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान संपूर्ण राज्यात राबविले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी या अभियानाचा कार्यक्रम बुधवार दि. २० रोजी सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी आयोजित करण्यात आला. या महाशिबीरात अपेक्षेहून अधिक दिव्यांगानी हजेरी लावल्याने मोठा प्रतिसादावर शिक्कामोर्तब झाले. मात्र महाशिबीरात समन्वयाचा अभाव राहिल्याने दिव्यांग ताटकळत राहिले. त्यात नोंदणी फॉर्म मिळवण्यासाठी धडपड करून ते उपलब्ध न झाल्याने दिसून आले.
शासनाच्या दिव्यांग प्रशासन, दिव्यांगांच्या दारी अभियानाचे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात ‘ दिव्यांगाच्या दारी’ अभियान आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचे राज्याचे अध्यक्ष ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने दिव्यांगासाठी उत्सुकतेचा कार्यक्रम होता. त्यांनीच राज्य सरकारची वेळोवेळी संघर्ष मे भूमिका घेऊन दिव्यांग मंत्रालयाची निर्मिती करून घेण्यात ते यशस्वी झाले होते.
शासनाच्या विविध योजना राबवित असताना दिव्यांग लाभार्थ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी, हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार संपूर्ण राज्यात हे अभियान सुरु आहे. सोलापुरात आयोजित अभियानात नोंदणी फॉर्म संप संपल्याने अनेक दिव्यांगाना नोंदणीपासूनही वंचित राहावे लागले.
विविध विकास महामंडळ सोलापूर यांचे योजनांची माहिती देणे आणि त्यांच्या लाभासाठी समुपदेशन करणे यासाठी जवळपास २२ स्टॉल लावण्यात आले होते. कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन परिसरात महा अभियानास आलेल्या दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची त्याचबरोबर भोजनाची व्यवस्था केली होती. पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याचबरोबर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने परिसरात फारशी वाहतुकीची कोंडी होऊन गैरसोय झाल्याचे दिसले नाही.