सोलापूर : मागच्या काही दिवसात ‘बाई पण भारी देवा ‘ या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. महिला मंडळ एकत्रित येऊन हा चित्रपट पाहिला, एन्जॉय केला. पण यापेक्षा काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न संगीता जोगधनकर यांनी सोलापुरात केला आहे. तब्बल 100 महिलांना एक दिवसीय सहल करून या शंभरही महिलांचे मैत्रीचे बंध घट्ट केले आहेत.
वीरशैव कक्कय्या महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी महिलांसाठी रोजच्या दैनंदिन जीवनातुन एक दिवसाचा वेळ काढून तो सहलीच्या रुपात मनासारखा मनमुराद आनंद लुटावा यासाठी एक दिवसीय सहलीचे आयोजन केले होते. निरा-नरसिंहपूर, शिखर शिंगणापूर, गोंदवलेकर महाराज मठ व पंढरपूर अशी ही सहल होती.
फक्त ६०० रुपये मध्ये १०० मैत्रिणींना सोबत घेऊन अति आनंदात, उत्साहात निरा-नरसिंहपूर, शिखर शिंगणापूर, गोंदवलेकर महाराज मठ व पंढरपूर हि एकदिवसीय सहल सफल झाली.
सहली दरम्यान इडली सांबार,चटणीचा नाष्टा, व मस्त चहाचा आस्वाद, दुपारचे जेवण चपाती, पनीर मसाला, बटाटा भाजी, दाल तडका, जिरा राईस, कोशिंबीर, गुलाब जाम, रात्रीचे जेवण डाळ खिचडी, लोणचे, पापड असे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. दिवसभराच्या जेवणाचा खर्च संगीता जोगधनकर व सुश्मिता कटकधोंड यांनी केला.
मनोरंजनामुळे सहलीला सुरुवात झाली आणि सोलापूर कधी आले कळाले नाही. सर्व जण धन्यवाद देत होते. आणखी पुढेही अशाच सहली काढत चला आम्ही येऊ अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या उपक्रमात प्रतिष्ठानच्या खजिनदार पवित्रा सोनकवडे, सचिव रेखा होटकर, सहसचिव छाया व्हटकर, सल्लागार प्रभावती व्हटकर, कार्यकारिणी सदस्य रेश्मा सोनवणे, संगिता होटकर, कांचन व्हटकर, गंगा कटकधोंड, रितु कटकधोंड यांचे सहकार्य लाभले.