सोलापूर : जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील दिव्यांग विभागात बराच गोंधळ आहे. अनेक वेळा या विभागाचा कारभार चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच राज्याच्या दिव्यांग सहाय्य मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू हे सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण मधील दिव्यांग विभागात शिक्षकांचे फरक आणि वेतनासाठी टक्केवारी मागितली जाते असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू यांनी शेजारी बसलेले जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोरच अतिशय सक्तपणे इशारा दिला. पहा ते काय म्हणाले..