सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे सचिव राजन कामत यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कामत हे वारंवार सोशल मीडियावर पक्ष विरोधी वक्तव्य करून पक्षाची बदनामी करीत असल्यामुळे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी शनिवारी कामत यांना नोटीस देऊन खुलासा मागविला होता. परंतु त्यांनी कोणताही खुलासा केला नाही. शेवटी वरिष्ठांच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती नरोटे यांनी शनिवारी दिली.
यावेळी नरोटे यांनी पक्षात राहून पक्षाची व नेत्यांची बदनामी करण्याचे काम जो कुणी करेल तो किती ही मोठा नेता असला तरी त्यांच्यावर पक्ष यापुढे कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला पहा नरोटे काय म्हणाले..