सोलापूरच्या पैलवानाने मशाल सोडून हाती बांधले घड्याळ
इंदापूर : भरणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विष्णू पैलवान निकंबे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये अधिकृत रित्या प्रवेश करण्यात आला.
कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी राष्ट्रवादी परिवारात स्वागत करत, पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या व सर्वांनी मिळून एकजुटीने एक दिलाने काम करून सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करावा अशी भावना व्यक्ती केली.
विष्णू पैलवान निकंबे यांनी सोलापूर महानगरपालिका 2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर महानगर पालिकेचे उपमहापौर पद भूषविले आहे. 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना या पक्षाकडून विष्णु निकंबे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
यावेळी विष्णू पैलवान निकंबे यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हि अजित पवार यांचे नेतृत्वाखाली सदैव शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी वैचारिक भूमिकेवर आधारित विचारधारेतून संघटनात्मक व सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. पक्षाने कायम केवळ विकासाभिमुख समाजकारणाला अग्रक्रम दिला असून, ह्याच वाटेवर आपण वाटचाल करणार असल्याची इच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तरे, माजी नगरसेवक गणेश पुजारीसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















