सोलापुरात बंजारा समाजाची वज्रमुठ ; मराठा समाजाने ही दिला पाठिंबा
निजाम काळात हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा एस.टी. (आदीवासी) म्हणून उल्लेख असल्यामुळे हैद्राबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस.टी.चे आरक्षण मिळावे,यासाठी आता महाराष्ट्रातील बंजारा समाज आक्रमक झाला असून त्याचे पडसाद सोलापुरात पाहायला मिळाले सोलापूर शहराने जिल्ह्यातील बंजारा समाज एकवटला सुद्धा 25 हजाराहून अधिक समाज बांधव मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर आले आणि त्यांनी निवेदन दिले. बंजारा समाजाला सोलापुरात मराठा समाजाने सुद्धा पाठिंबा दिला आहे.
सोलापूर मध्ये बंजारा समाजाच्या बांधवांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाने पारंपारिक संस्कृतीचे दर्शन घडवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंजारा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी युवराज राठोड यांनी केली.
या बंजारा समाजाच्या आरक्षणाला वेळोवेळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला हैदराबाद गॅझेट लागू करायला भाग पाडले आणि त्याच गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजासह, बंजारा समाजालाही त्यांच्या नोंदी मिळायला फायदा होत आहे आणि त्यामुळे अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने बंजारा समाजाच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. या शिष्टमंडळात अखंड मराठा समाजाचे रवी मोहिते, महेश घाडगे, रविकांत भोपळे, अँड गणेश कदम, पोपट भोसले, विकास कदम यांचा समावेश होता.
यावेळी कर्नाटक बंजारा समाजाचे धर्मगुरू जुगनू महाराज, विजापूरचे आमदार देवानंद चव्हाण, आमदार राजेश राठोड,
आमदार हरिभाऊ राठोड, सुभाष चव्हाण, युवराज राठोड, मेनका राठोड, नाम पवार, युवराज चव्हाण युवराज पिंटू चव्हाण, अश्विनी चव्हाण, शैलजा राठोड, संतोष पवार, दीपक पवार, संदीप राठोड, विजय राठोड, लाला राठोड, विजयकुमार राठोड, अलका राठोड, अशोक चव्हाण, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, सुरज जाधव, विजय उमाकांत राठोड
भोजराज पवार, प्रेमसिंग राठोड, अश्विनी राठोड, नीलकंठ राठोड, दीपक पवार, सिद्राम राठोड, प्रेमसिंग राठोड, प्रवीण पवार, अवी राठोड यांचा समावेश होता. बंजारा समाजाच्या बांधवांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त केले.